धक्के पे धक्का : उद्धव गटाला जिल्ह्यात अजून एक धक्का

जुलै 16, 2022 7:28 PM

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । जिल्ह्यात शिवसेनेला अजून एक धक्का बसला असून आ. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांचे राजीनामा देणे अजूनही सुरूच आहे.दानिश फिरोज पठाण शिवसेना अल्पसंख्याक आघाडी प्रमुख धरणगाव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा जिल्हा अध्यक्ष विष्णू भंगाळे यांना सुपूर्द केला आहे.

GULABRAO PATIL 8 jpg webp

दानिश फिरोज पठाण शिवसेना अल्पसंख्याक आघाडी प्रमुख धरणगाव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा जिल्हा अध्यक्ष विष्णू भंगाळे यांना सुपूर्द केला आहे. यावेळी या राजीम्यात म्हटले आहे कि, माजी मंत्री मी आ. गुलाबरावजी पाटील यांचा खंदा समर्थक असून गुलाबभाऊंनी आमच्या समाजाला मागेल ती विकासकामे व मदत केलेली आहे. आमच्या सर्व सुखदुःखात माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील, त्यांचे चिरंजीव जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील हे सदैव हजर असतात. त्यामुळे मी राजीनामा देत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांना राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी देखील समर्थन दिले आहे. धरणगावात शिवसेनेचा मेळावा देखील घेण्यात आला होता. तेव्हाच गुलाबराव पाटील समर्थकांनी याकडे पाठ फिरवली होती. तर मध्यंतरी मतदारसंघातील सर्व महत्वाच्या पदाधिकार्‍यांनी आ. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांची सोबत कायम राखणार असल्याची ग्वाही दिली होती.त्यांनतर शिवसेना अल्पसंख्याक आघाडी प्रमुख फिरोज पठाण यांनी राजीनामा दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now