महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी बहिणाबाईंच्या शब्दात सांगतो की..; जळगावच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बरसले

ऑगस्ट 13, 2024 5:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२४ । जळगावच्या सागर पार्क येथे महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहे. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण योजने’वर भाष्य केलं. तेव्हा त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तसंच महायुतीतील नेत्यांनाही सुनावलं आहे.

Jl Fadanvis jpg webp

रोज हे नवीन नवीन खोटं सांगतात हे खोटं सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी बहिणाबाईंच्या शब्दात सांगतो. काही लोक खोटं बोलून बोलून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभेत संविधान बदलल्याबद्दल खोटं विरोधकांनी पसरवलं.

ज्या ठिकाणी चंद्राने सूर्या जोपर्यंत आहे. तोपर्यंत कोणी आरक्षण संपवू शकत नाही. निवडणूक आल्या काय हे खोटो पसरवण्याचे काम करतात, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील सिंचनाचे अनेक प्रकल्प आपण मार्ग लावलेले आहेत. जळगाव जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याकरता महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे. बहिणींच्या प्रेमाचं कवच असल्यामुळे आमचं कोणीच काही वाकड करू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now