जळगाव जिल्हाभुसावळ

नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता आल्यास विकासकामे जोमाने : खा. रक्षा खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । वरणगाव नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता आल्यास आणखी विकासकामे जोमाने करणार असल्याचे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी येथे केले. वरणगाव शहरातून साईबाबा मंदिर ते पुलगाव फाटा दरम्यानच्या समांतर महामार्गाच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या.

प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जि.प.चे उपाध्यक्ष नंदू महाजन, माजी सभापती राजेंद्र चौधरी, सहकार मित्र चंद्रकांत बढे, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, विनोद पाटील, हाजी अल्लाउद्दीन शेठ, मनोहर सराफ, प्रणिता पाटील, रुक्मिणी काळे, उपनगराध्यक्ष अखलाख आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे तर आभार तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर यांनी मानले. यावेळी राजू भंगाळे मयूर भंगाळे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

यावेळी कार्यक्रमाला साबीर कुरेशी, रमेश पालवे, अरुण बावणे, आकाश निमकर, नाना चौधरी, गोलू राणे, नटराज चौधरी, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, सुनील बर्‍हाटे, कदीर शेठ, डी.के.खाटीक, शेख फहिम शेख, अलीम भाई, फझल शेख, ईरफान पिंजारी, जिल्हा चिटणीस संजय कुमार जैन, माजी सरपंच सुभाष धनगर, जय चांदणे, योगेश माळी, मुस्लिम अन्सारी, गजानन वाघ, बळीराम सोनवणे, रामभाऊ माळी, संदीप भोई, हितेश चौधरी आदींची उपस्थिती होती. डॉ.राजेंद्र फडके यांनी रेल्वे समस्या सोडवण्याची ग्वाही दिली.

Related Articles

Back to top button