वाचनातून व्यक्तिमत्वाची जडणघडण – प्रा.डॉ.केसुर
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२२ । मू.जे.महाविद्यालातील मराठी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन, चिंतन व मनन करणे गरजेचे आहे, त्यामुळेच स्वत:चे व्यक्तिमत्व हे विकसित होत जाते. विद्यार्थ्यांनी ग्रंथांचे महत्व जाणले पाहिजे आणि पुढे त्यातूनच आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टी ह्या घडत जातात. आपल्या आयुष्यात आपण पुस्तके समजून घेतली पाहिजेत असे प्रतिपादन प्रा.डॉ.भूपेंद्र केसुर यांनी केले.
मू.जे.महाविद्यालातील मराठी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आणि वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमात ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्रातील काही निवडक भागांचे सिद्धी उपासनी, राधिका बोरसे, जया पाटील, उर्मिला चौधरी व चंचल धांडे या विद्यार्थ्यांनी अभिवाचन केले. याप्रसंगी मंचावर मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील, डॉ. योगेश महाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. गोपीचंद धनगर यांनी केले. कार्यक्रमास यावेळी ७० विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी डॉ. विलास धनवे, डॉ. अतुल पाटील, प्रा. भावना संकोपाळ यांनी परिश्रम घेतले.
Attachments area