⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जळगाव शहराचा होत नाही विकास : शिवसैनिकाने थेट पक्षश्रेष्टींकडे केली तक्रार

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. पालकमंत्री शिवसेनेचेच आहेत. राज्यात शिवसेनेचीच सत्ता असून नगरविकास मंत्री हे शिवसेनेचेच आहेत. तरीदेखील जळगाव शहरातील विकास गेल्या वर्षभरापासून झाला नाहीये. जळगाव शहराच्या विकासासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी भरघोस निधी देवून देखील त्या निधीचा वापर सत्ताधारी शिवसेनेला करता आला नाही. ज्यामुळे शिवसेनेची प्रतिमा जनमानसामध्ये काळवंटली आहे. अशी तक्रार शिवसेना माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे (Gajanan Malpure) यांनी पक्षश्रेष्ठींना दिली असल्याची माहिती स्वतः त्यांनी ‘जळगाव लाईव्ह’ला बोलताना दिली.

यावेळी ते म्हणाले की, जळगाव शहरासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता. तर दुसरीकडे नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी देखील जळगाव शहराचा विकास व्हावा या हेतूने भरवस्तीत जळगाव शहराला उपलब्ध करून दिला. ह्या निधीच योग्य वापर सत्ताधारी शिवसेनेत बसलेल्या लोकप्रतिनिधींना करता आला नसल्याने यामुळे जनमानसात शिवसेना विरोधी भावना निर्माण होत आहे. ज्यामुळे अशा लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी मालपुरे (Gajanan Malpure) यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली.तर दुसरीकडे जळगाव शहरासाठी अधिक 50 कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा असेही विनंती यावेळी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली असल्याची माहिती गजानन मालपुरे यांनी ‘जळगाव लाईव्ह’ शी बोलताना.

याच बरोबर जळगाव शहराचा विकास करताना नगरसेवकांना समसमसमान निधी देण्यात आला नव्हता यामुळे शिवसेना नगरसेवक शिवसेनेत नाखूष आहेत. याच बरोबर घरपट्टी वाढवल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र शिवसेना नगरसेवकांचा विरोध असूनही हा निर्णय घेतला असल्याने तो शिवसेनेतला शुक्राचार्य कोण ? हे शोधून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार यावेळी त्यांनी केली.

पुढे बोलताना (Gajanan Malpure) ते म्हणाले की, जळगाव शहरात असे कित्येक पदाधिकारी आहेत जे फक्त पद घेऊन शिवसेनेचा काही काम करत नाहीत. अशांवर देखील कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी केली होती. यावर पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात अशी ‘ग्वाही’ पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आली आहे.

“जळगाव शहरासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भरघोस निधी दिला. याच बरोबर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भरघोस निधी उपलब्ध करून दिला. मात्र अशा वेळी देखील जळगाव शहराचा विकास होत नसल्याने एक शिवसैनिक म्हणून माझ्या मनात त्याची खंत आहे. जी खंत मी स्वतः पक्षश्रेष्ठींकडे मांडली असून जळगाव शिवसेनेत असलेल्या त्या शुक्राचार्य वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.”
गजानन मालपुरे (Gajanan Malpure)