---Advertisement---
मुक्ताईनगर

गुरांच्या गोठ्यांचे बांधकाम नसताना खात्यावर पैसे जमा, वाचा हा प्रकार कुठलाय ?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्युज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे गुरांचे गोठा बांधकाम प्रकरणी लाखोचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रहारच्या तालुकाध्यक्षांसह कार्यकत्यांनी केला असून या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी गटविकास अधिकारीऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

bhrashtachar 2 jpg webp

तालुक्यातील अंतुर्ली येथील ३४ पशुपालकांचे गुरांसाठी नवीन गोठ्यांचे प्रकरण मंजुर झाले होते. परंतु,एकाही लाभार्थाने गोठ्याचे बांधकाम केले नसताना त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम १७ लाख ८८ हजार ४०० रुपये जमा झाली. त्यामुळे पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होतेय.

---Advertisement---

त्यामुळे सरपंच, ग्रामसेवक तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीररीत्या कारवाई करण्यात यावी, अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले. प्रहारचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सांगळकर, उपाध्यक्ष युवराज कापसे, यूवा तालुकाध्यक्ष अनिल कान्हे, शहर अध्यक्ष मोहन महाजन आदींच्या दिलेल्या निवेदनावर सह्या आहे.

दरम्यान, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी ग्रामविकास अधिकार्यांकडे याबाबतचा अहवाल मागविला असून काय उघडकिस येते व कारवाई होणार ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागुन आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---