उत्तर प्रदेश व आसाम सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । जळगाव येथे मौलिक अधिकार मंच जळगावची स्थापना करण्यात आली असून या मंच मार्फत २८ सप्टेंबर, मंगळवार रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालया समक्ष धरणे आंदोलन होत आहे.
या धरणे आंदोलनाला च्या माध्यमाने उत्तर प्रदेश सरकारने मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू मौलाना हजरत कलीम सिद्दिकी यांना धर्मांतरण या कायद्याखाली अटक केली असून त्यांच्यासह इतर मौलवींना सुद्धा अटक केलेली आहे सदर अटक संविधानाच्या विरोधात असल्याने तसेच आसाम राज्यात अतिक्रमणाच्या नावाखाली ८०० लोकांना आपल्या घरातून काढून त्यांची घरे जमीनदोस्त करण्यात आली त्याविरुद्ध ते आंदोलन करीत असताना त्यांच्यावर पोलिसांनी लाठीमार व गोळीबार केला त्यात दोन जणांचा मृत्यू झालेला असल्याने या दोन्ही घटनेचा निषेध म्हणून हे धरणे आंदोलन होत आहे.
या धरणे आंदोलनाच्या मौलिक अधिकारी मंचाचे अध्यक्ष मुफ्ती हारून, मुख्य समन्वयक मुफ़ती अतिकउर रहेमान, कार्य वाहक कारी अतिक पटेल, मुफ्ती खालिद, मौलाना सलमान सलीक,मौलाना अख्तर नदवी, मौलाना मुजम्मिल काजी यासह विविध राजकीय ,सामाजिक संघटना व बिरादरी च्या प्रतिनिधींचा यात समावेश आहे. तरी या आंदोलनात जळगावकरांनी सामील व्हावे असे आव्हान आयोजकांतर्फे फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.