जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२४ । कोलकत्ता येथील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय येथील द्वितीय वर्ष पीजीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली असून या घटनेच्या निषेधार्थ व डॉक्टरांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय जळगाव यांनी प्रदर्शन व कॅण्डल मार्च केले.
ही रॅली काव्यरत्नावली चौकापासून सुरू होऊन पुढे आकाशवाणी चौकातून पुन्हा काव्यरत्नावली चौकात संपलीया रॅलीमध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थी व अध्यापकांनी, झालेल्या घटनेचा निषेध करत पीडित महिला डॉक्टरच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी व तिला न्याय मिळवून, तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली.
“We want justice” च्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी ही रॅली कॅण्डल लावून व पीडीतास श्रद्धांजली अर्पण करून रॅलीचा समारोप केले. या रॅलीमध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ सुभाषचंद्र मडावी सर, शरीर रचना विभाग प्रमुख डॉ शेख सर, अगतंत्र विभाग प्रमुख, डॉ अगातराव अवघडे सर रोगनिदान विभागाचे डॉ श्रीकांत काटे व डॉक्टर क्षितिज गर्गे सर पंचकर्म विभागाचे डॉ अनिल वाघ सर व डॉ श्रीराम रगड सर, अगतंत्र विभागाचे डॉ चेतनकुमार पाटील सर व डॉ रवींद्र पांढरे सर, कायचिकित्सा विभागाचे डॉ संदीप सुसे सर, स्वस्तवृत्त विभागाचे डॉ प्रशांत सरडे सर, प्रसुती तंत्र व ते स्त्रीरोग विभागाच्या डॉ स्वाती सुसे मॅडम, शालाक्यतंत्र विभागाच्या डॉ पल्लवी जाधव मॅडम व रसशास्त्र विभागाच्या डॉ विशाखा पाटील मॅडम उपस्थित होत्या.