⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

दिल्लीच तख्त जळतय : जळगावचा नंबर लवकरच..

जळगाव लाईव्ह न्युज | चिन्मय जगताप | गेल्या कित्येक दिवसापासून संपूर्ण दिल्ली शहर हे कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे जळत आहे. दिल्ली शहराच्या बाजूला असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर नियोजित पणे कचऱ्याची विल्हेवाट न लावल्याने त्या डम्पिंग ग्राउंडला आग लागली आहे. याच आगीचे कारण म्हणून दिल्ली शहरावर धुराची चादर पसरली आहे. मात्र जळगाव शहरात ही हीच परिस्थिती उद्भवला वेळ लागेल असं वाटत नाही. कारण मंजूर असलेल्या घनकचरा प्रकल्पाला काही कोटी रुपयांसाठी आणि काही नेत्यांच्या स्वार्थापोटी वर्क ऑर्डर देण्यात आली नाहीये.

आपल्या घरातला कचरा ज्या प्रकारे आपल्या घरासाठी हानिकारक असतो त्याच प्रकारे तो शहरासाठी देखील हानिकारक असतो. यासाठीच त्याच्या व्यवस्थित विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावणे अतिशय गरजेचे असते. जळगाव शहरातील आव्हाड शिवरात घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या ठिकाणी हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी राज्य शासनातर्फे निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भातला ठराव महापालिकेच्या महासभेत मंजूर देखील झाला आहे. मात्र ह्या संदर्भातले कार्यादेश अजून त्या मक्तेदारीला देण्यात आलेले नाहीत. मक्तेदार खर्चा मध्ये झालेल्या वाढीमुळे अधिक पैशाची मागणी करत आहे. मात्र मनपा ते देण्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे.

मात्र जर हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाला नाही आणि घनकचरा प्रकल्पाची स्थिती अशीच राहिली तर ज्याप्रकारे दिल्ली जळत आहे त्याचप्रकारे एक दिवस जळगाव शहर देखील जळेल. कारण गेल्या पाच वर्षापासून संपूर्ण जगाचं तापमान वाढत आहे. तापमान वाढीमुळे आणि कचऱ्यामध्ये असलेल्या इथेनॉलमुळे कचऱ्याला मोठ्याप्रमाणावर आग लागते. या लागलेल्या आगीमुळे सर्वत्र धुराची चादर पसरते. आणि ह्या पसरलेल्या धुराच्या चादरीमुळे नागरिकांना विविध शारीरिक रोगांना तोंड देऊ लागू शकते.

दिल्लीमध्ये सध्या वाढलेल्या तापमानामुळे व तिथल्या प्रशासनाने न केलेल्या योग्य कचऱ्याच्या विल्हेवाटीची मुळे दिल्ली शहर जळत आहे जळगाव शहराची तऱ्हा देखील दिल्लीपेक्षा वेगळी नाही. इथल्या स्थानिक प्रशासनहि दिल्लीच्या स्थानिक प्रशासनाला सारखे झोपलेले आहे. यामुळे एक दिवस नक्की जळगाव जळेल याची खात्री वाटत आहे.