लाखाच्या घरात पगार, तरी पाच हजाराची मागितली लाच; दीपनगरच्या अधीक्षक अभियंत्याला अटक

नोव्हेंबर 21, 2025 9:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२५ । भुसावळच्या दीपनगर वीज केंद्रातील बीटीपीएस विभागातील अधीक्षक अभियंत्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. बिल मंजुरीसाठी पाच हजार रूपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. भानुदास पुंडलिक लाडवंजारी (वय ५७, रा. नेहरू नगर, जळगाव) असं गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्याचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली.

lach jpg webp

तक्रारदार दीपनगर औष्णीक वीज निर्मिती केंद्रातील २१० प्रकल्पातील एका कंपनीत साईट सुपरवायझर आहेत. २८ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान २१० प्रकल्पाच्या तळाशी जमणारी राख उचलणे, मोडतोड व तेलाचे बॅरेल काढणे, वाहतुकीसाठी संबंधित कंपनीने २ लाख २८ हजार ५४४ रुपयांचे बिल बीटीपीएस विभागाचे मुख्य अभियंता लाडवंजारी यांच्याकडे सादर केले होते. हे बिल मंजूर करण्यासाठी त्याने पाच टक्क्यांप्रमाणे ५ हजारांची लाच मागितली. २९ एप्रिल २०२५ रोजी सापळा लावला होता. मात्र, संशय आल्याने लाडवंजारी याने लाच स्वीकारली नाही. मात्र, एसीबीच्या पडताळणीत त्याने लाच मागणी केल्याचे सिद्ध झाले.

दरम्यान, बीटीपीएस विभागाचा मुख्य अभियंता भानुदास लाडवंजारी याला सुमारे पावणेदोन लाख रूपये वेतन आहे. ५७ वर्षे वय असल्याने तो निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. एसीबीने त्याला दुपारी दीपनगर केंद्रातून अटक केली. त्याच्या निवासस्थानी पथकाने झडती घेतली. मात्र, आक्षेपार्ह काही आढळले नाही, असे सूत्रांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now