जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२५ । केंद्राने जीएसटीच्या दरात कपात केल्यानं अनेक वस्तू स्वस्त झाले आहे. यात सुकामेव्याच्या किंमतीत घट झाल्याचे पाहायला मिळत असून यामुळे सामान्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. जीएसममधील बदलांमुळे दर हे तब्बल २० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज ड्रायफ्रूट असोसिएशनने व्यक्त केला आहे.

खरंतर दिवाळी सण म्हटला की घरगुती स्वरुपाच्या वस्तू तयार करण्यासाठी गृहिणींकडून खरेदीसाठीचे नियोजन सुरु केले जाते. काही जण दिवाळीचा फराळ घरी बनवतात तर काही जण काहीजण बाहेरुन फराळ खरेदी करतात. या फराळामध्ये काजू, बदाम अशा सुकामेव्याचा वापर केला जातो. तसेच दिवाळीत ड्रायफ्रुटस मोठ्या प्रमाणात एकमेकांना भेट दिले जातात.यंदा दिवाळीआधीच सुकामेवा स्वस्त झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारकडून वस्तू आणि सेवा कर यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याने स्थानिक बाजारपेठांमध्ये आणि प्रदेशातून आयात होणाऱ्या सुकामेव्यावर मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधी १,००० रुपयांच्या सुक्यामेव्यावर १२० रुपये जीएसटी द्यावा लागत असे, आता त्यावर फक्त ५० रुपये द्यावे लागतील.
घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर:
बदाम
पूर्वीचे दर : ९०० ते ११००
सध्याचे दर : ७५० ते ९००
जर्दाळू
पूर्वीचे दर : ५०० ते ८००
सध्याचे दर : ४०० ते ६००
अंजीर
पूर्वीचे दर : १५०० ते १८००
सध्याचे दर : १२०० ते १६००
खारा पिस्ता
पूर्वीचे दर : १२०० ते १४००
सध्याचे दर : १००० ते १२००
खारीक
पूर्वीचे दर : २५० ते ४००
सध्याचे दर : २०० ते ३००
खजूर मध्यम
पूर्वीचे दर : १५० ते ४००
सध्याचे दर : १२० ते ३५०












