जळगाव लाईव्ह न्यूज । अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे आज जळगाव दौऱ्यावर असून यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ जळगावचे पदाधिकाऱ्यांकडून अण्णासाहेब व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले

यात १९ फेब्रुवारी या दिवशी शिव जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. तरी आपण १९ फेब्रुवारीला ‘ड्राय डे’ घोषित करावा अशी विनंती करण्यात आली. याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे महानगर अध्यक्ष पियूष पाटील, उपाध्यक्ष अजिंक्य पवार, सरचिटणीस सौरभ पाटील, शहर संघटक निरंजन पाटील, नयन चव्हाण, सुजित चव्हाण, लकी पाटील, रोहन देशमुख आदी उपस्थित होते.