⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, पोलीस मित्र संघटनेची मागणी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, पोलीस मित्र संघटनेची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली होती. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी मुली व महिलांनवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या निर्दयी नराधमांना फाशीची शिक्षेची अंमलबजावणी करावी जेणेकरून महिला व लहान मुलींवरील वारंवार होत असलेले अन्याय अत्याचाराला आळा बसेल. यासाठी महाराष्ट्र राज्याला महिला मुख्यमंत्र्याची नितांत गरज असून महिला मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात यावी.अशी‌ मागणी ही करण्यात आली. यावेळी युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक भानुदास पवार व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शेरखान उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह