⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

पाणी प्यायल्याने पक्षी, कुत्र्यांचा मृत्यू; हे आहे धक्कादायक कारण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १५ सप्टेंबर २०२३ | पारोळा शहराजवळील शिवल्या नाल्याचे पाणी प्यायल्याने पक्षी व दोन कुत्र्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. या नाल्यातील संपूर्ण पाणी पिवळे, लाल झाले आहे. त्यामुळे अनेक पक्षी मृत झाले आहेत. एका धनगराच्या चार मेंढ्या पाण्यात उतरल्या असता त्यांची कातडी सोलल्या गेली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पारोळा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर चोरवड रस्त्यावरील शिवल्या नाल्यात अज्ञात व्यक्तीने विषारी रसायनयुक्त पदार्थ टाकल्याने येथील पाणी दूषित झाले. हे पाणी प्यायल्याने काही पक्षी व दोन कुत्री जागीच मृत्युमुखी पडली आहेत. सकाळी नाल्याच्या बाजूला शेतकरी मंगेश पाटील हे आपल्या शेतात गुरांसह आले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी पारोळा शहर तलाठी निशिकांत माने यांना याबाबत माहिती दिली. या वेळी पारोळा तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पोलिस निरीक्षक सुनील पवार, फौजदार वसावे व गुप्त शाखेचे महेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हा घडलेला प्रकार वेस्टेज बांधकामाच्या वॉलपुट्टीच्या थैल्या व काही किराणाचा एक्स्पायर झालेला माल त्या ठिकाणी कोणीतरी अज्ञात व्यक्ती टाकून गेल्याने या वस्तू नाल्यातील पाण्यात विरघळल्या. नाल्यातील संपूर्ण पाणी पिवळे, लाल झाले आहे. त्यामुळे अनेक पक्षी मृत झाले आहेत तसेच दोन कुत्र्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका धनगराच्या चार मेंढ्या पाण्यात उतरल्या असता त्यांची कातडी सोलल्या गेली आहे.

पारोळा पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी नाल्याजवळील या विषारी वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. तसेच मोठा शोषखड्डा करून या पाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी, असे आदेश दिले आहेत. “घडलेला प्रकार गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी या परिसरात आपले पशुधन घेऊन जाऊ नये. तसेच आपले कुठलेही वेस्टेज हे कुठेही न फेकता पालिकेच्या घंटागाडीच्याच ताब्यात द्यावे, असे आवाहान पारोळ तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी केले आहे.