जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मंगळवारी रात्री मृत्यू झाला. शैलेंद्र यादव ( वय ३४, मूळ रा. बिहार) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. चार तास उलटूनही अधिकारी न आल्याने कामगार अधिकच संतप्त झाले व त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन, मयत कर्मचाऱ्याच्या परिवारास भरपाईची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाकडून उत्तर न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचा संताप अनावर होऊन किरकोळ दगडफेक करत, वाहनेही फेकण्यात आली. यावेळी पोलिसांनी लागलीच धाव घेत कर्मचाऱ्यांना हटविले आहे. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, दीपनगर प्रकल्पात विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपासून आधीच कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. हे आंदोलन सुरु असताना एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी १०.३० वाजता नवीन ६६० प्रकल्पाच्या गेटवर आंदोलकांनी मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरले होते.
दीपनगर प्रकल्पातील कर्मचारी शैलेंद्र यादव (वय ३४, मूळ रा. बिहार) हा इंडवेल कंपनीत काम करीत होता. आजारी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी (दि. ४) रोजी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. त्याचे निधन झाल्यानंतर त्याचा मृतदेह बिहारकडे रवाना करण्यात आला. मात्र, नियमानुसार या कर्मचाऱ्याच्या वारसाला सर्व भरपाई देण्याची कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे.
कर्मचारी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
दीपनगरात कर्मचारी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अप्रिय घटना टाळण्यासाठी वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे तसेच कर्मचारी सुरक्षिततेबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसास योग्य ती भरपाई द्यावी, तसेच अन्य प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात. मृत कर्मचाऱ्याचा मृतदेह पुन्हा आणावा म्हणून कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे आग्रह धरला. चार तास उलटूनही अधिकारी न आल्याने कामगार अधिकच संतप्त झाले व त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी किरकोळ दगडफेक करत, वाहनेही फेकण्यात आली.
हे देखील वाचा :
- उद्या महायुतीचा शपथविधी? संभाव्य मंत्र्यांची नावे समोर, जळगावातील या आमदारांचा समावेश?
- सोन्याने उधळला दरवाढीचा गुलाल; जळगावात आज प्रति ग्रॅमचा भाव किती?
- जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे; “हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर आ. राजूमामांची प्रतिक्रिया
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक