⁠ 
बुधवार, मे 22, 2024

धावत्या लक्झरीतून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । फैजपूर-भुसावळ मार्गावर भरधाव स्लीपर कोच लक्झरीतून पडल्याने सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशाचा मृत्यू झाला. दादाहरी विश्वनाथ इंगोले (41, रा.महिम, ता.सांगोला, जि. सोलापूर) असे मयत प्रवाशाचे नाव असून या घटनेप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रवाशाने धावत्या वाहनातून उडी मारल्याचीदेखील चर्चा आहे.

याबाबत असे की, रावेर येथून श्री बालाजी ट्रॅव्हलची बस (क्रमांक एम.एच. 21 एक्स 3399) ही 23 रोजी रात्री आठ वाजता प्रवाशांना घेवून पुण्याकडे रवाना झाली. या बसमधून दादाहरी विश्वनाथ इंगोले हे देखील प्रवास करीत होते. यावल तालुक्यातील अकलूदजवळ बसमधील स्लीपर कोचमध्ये झोपलेल्या दादाहरी इंगोले हे कोसळल्याने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले. या प्रकरणी कासवा पोलिस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मकसूद शेख, सहायक फौजदार हेमंत सांगळे, किरण चाटे, विकास सोनवणे करीत आहे.

प्रवाशाने लक्झरीतून उडी मारल्याची चर्चा
प्रवासी दादाहरी इंगोले यांच्या मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, डॉ.निखील तायडे यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह त्यांच्या नातलंगांना सोपवण्यात आला. मयत हे पुण्यात सध्या वास्तव्यास असल्याची माहिती असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परीवार आहे. दरम्यान, धावत्या लक्झरी वाहनातून त्यांनी उडी मारल्याची चर्चा आहे. या प्रकरणी अद्याप जाबजवाब नोंदवण्यात आले नसल्याचे सहा.निरीक्षक यांनी सांगत त्यानंतर घटनेची स्पष्टता होईल, असेही ते म्हणाले.

हे देखील वाचा :