रविवार, डिसेंबर 10, 2023

जळगाव शहरात भर दिवसा केला गोळीबार ; घटनेने उडाली खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२३ । जळगाव शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी वाढताना दिसत असून अशातच आज शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात भर दिवसा हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आलीय. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु केली आहे.

नेमका प्रकार काय?
शिवाजीनगर हुडको परिसरात पूर्व वैमनस्यातील वादातून भांडण होऊन ते चिघळले. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असता इतक्यात वाद घालणार्‍यांपैकी एकाने हवेत गोळीबार केला. यामुळे जमलेले लोक तेथून तात्काळ निघून गेले.

या प्रकाराची माहिती मिळताच शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हवेत गोळीबार करणार्‍याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील संशयिताची कसून चौकशी सुरू असून तो आधी देखील एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी असून जामीनावर सुटून बाहेर आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दरम्यान, शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपी दीपक बागुल याला ताब्यात घेतले आहे