गुन्हेजळगाव जिल्हा

रावेर हादरले! सावत्र बापाने केला चिमुकलीचा खून ; आईचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२४ । एकीकडे जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी वाढताना दिसत असून अशातच रावेर तालुक्यातून अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आलीय. तीन वर्षीय मुलीचा सावत्र बापाने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणात मुलीची आई आणि सावत्र बापाला अटक करण्यात आली आहे. अजय शांताराम घेटे (वय २९) व माधुरी भारत म्हसाणे (२५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

नेमकी काय आहे घटना?
बेलसवाडी येथील माधुरी हिचा विवाह मध्य प्रदेशातील वारोली (ता. बर्हाणपूर) येथील भारत साहेबराव म्हसाणे याच्याशी सन २०१७ मध्ये झाला होता. पतीशी वाद झाल्याने माधुरी ही मुलगा पीयूष (५) व मुलगी आकांक्षा (३) हिला सोबत घेऊन माहेरी निघून आली होती. यानंतर दीड महिण्यापुर्वी रावेर येथील अजय घेटे याच्याशी तिने लग्न केलं. आपल्या संसारात पूर्वाश्रमीच्या अपत्यांचा खोडा नको असल्याने अजय याने तिला लाकडी दांडक्याने मारून व गळफास दिला. ही घटना रावेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील त्याच्या राहत्या घरात घडली.

दरम्यान, ही घटना मुलीची आई माधुरीस माहित असताना तिने पुरावा नष्ट करण्याच्या व मृतदेहची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृतदेह पती-पत्नी अजय व माधुरीने माहेरी बेलसवाडी येथे नेला. मात्र यावेळी माधुरीचा पहिला पती व मुलीचा सख्खा बाप भारत म्हसाने याला समजल्यावर त्याने बेलसवाडी गाठले. त्याने मुलगा पियुष याला विचारणा केल्यावर “दुसऱ्या पप्पाने मारले” असे सांगितले.

याबाबत मुक्ताईनगर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आकांक्षाचा मृत्यू हा गळा आवळून झाल्याचा प्रथमदर्शनी अहवाल वैद्यकीय सूत्रांनी दिला. भारत म्हसाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसांत अजय घेटे व माधुरी म्हसाणे यांच्याविरुद्ध खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी हा गुन्हा रावेर पोलिसांत वर्ग करण्यात आला. त्यात वरील दोघांना अटक करण्यात आली

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button