⁠ 
सोमवार, मे 27, 2024

‘तारीख तेरा मतदान मेरा’ नवमतदारांना लोकशाहीत सहभाग वाढवण्यासाठी गोदावरी नर्सिंगतर्फे जनजागृती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२४ । जळगाव येथील गोदावरी नर्सिंगच्या विदयार्थ्यांनी लोकशाहीत नवमतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी ‘तारीख तेरा मतदान मेरा ‘घोषणा एकसुरात देत रॅलीसह जनजागृती केली.

जिल्हाधिकारी आयुषप्रसाद यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ९ मे रोजी सकाळी १० वा. गोदावरी नर्सिंगच्या विदयार्थ्यांनी नवमतदाराचा लोकशाहीत सहभाग तसेच मतदानाचा टक्‍का वाढवण्यासाठी परिसरात रॅली काढण्यात आली या रॅलीत सहभागी झालेल्या विदयार्थ्यांनी भारत निर्वाचन आयोग यांचा लोगो असलेले टीशर्ट परिधान केले.तसेच मतदान जनजागृती फलक हातात घेत ङ्गतारीख तेरा मतदान मेराङ्घ या घोषणा एकसुरात देण्यात आल्यात.

तर परीसरात वेगवेगळया ठीकाणी रांगोळीच्या माध्यमातून देखिल मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले तर परिसरात ठीकठीकाणी मतदान तारीख सेल्फी पॉईंटची निर्मीती करण्यात आली. यावेळी नवमतदारच नाही तर रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्ण व नातेवाईकांना देखिल मतदानाचे महत्व पटवून देतांना १३ तारखेस मतदानाचे आवाहन केले. याचबरोबर वैद्यकिय, फिजिओथेरपीे, होमीओपॅथी तसेच कृषि महाविद्यालयातील नवमतदारांना देखिल आवाहन करण्यात आले. रॅलीची सांगता विदयार्थी व शिक्षक शिक्षकेतर वृदांच्या उपस्थीतीत राष्ट्रगित गायनाने करण्यात आली.