जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ६२ वर्षीय सासऱ्याने पंचवीस वर्षीय सुनेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १४ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता घडली. याप्रकरणी मंगळवारी जिल्हापेठ पोलिसांत सुनेच्या फिर्यादीवरून सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ लाख रुपये द्यावे म्हणून १४ जुलै रोजी दुपारी सासऱ्याने सुनेशी वाद घातला. त्यानंतर सुनेचा गळा दाबून मनाला लज्जा वाटेल, असा स्पर्श करत विनयभंग केला. सुनेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला; मात्र सासऱ्याने गळा दाबून शिवीगाळ केली. अखेर सुनेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येऊन संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









