शुक्रवार, डिसेंबर 1, 2023

अखेर MPSC उत्तीर्ण दर्शना पवारच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक ; हत्येचं कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२३ । अहमदनगरची रहिवासी असलेली दर्शना पवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या (MPSC) कठीण परीक्षेत तिसरा क्रमांक मिळवून अधिकारी बनली. मात्र राजगडमध्ये १८ जून रोजी तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र तिची हत्या झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर पाचव्या दिवशी या प्रकरणाचा मोठा उलगडा झाला आहे.

या प्रकरणी मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे. राहुल हंडोरे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने हत्या का केली याचं कारण पोलिसांना सांगितले असून कारण ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला आहे.

म्हणून दर्शनाला संपविले?
दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक असून दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही MPSC ची परीक्षा देत होते. दोघांपैकी दर्शना आधी एमपीएससी उत्तार्ण झाली. तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली.

त्यामुळे वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असा आग्रह धरला. तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे दर्शना आणि तिच्या कुटुंबियांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.

दरम्यान, दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनला फिरण्यासाठी राजगडावर गेले. दोघे गड चढत असल्याचा प्रकार CCTV फुटेजमध्ये कैद झाला. फुटेजमध्ये दोघेही राजगडावर जाताना दिसत होते. मात्र त्यानंतर राहुल हंडोरे एकटाच परत आला. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. अन् त्याचा शोध सुरु केला. त्याच्या शोधासाठी पाच पथके तयार केली होती. अखरी त्याला पकडण्यास पोलिसांना यश आले.