⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

वणी गडावरील सप्तशृंगीच्या दर्शनासाठी जाताय? आधी ‘ही’ बातमी वाचा, अन्यथा होईल गैरसोय

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतेय. आज मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर ढगफुटीसारखा पाऊस झाला असून यामुळे गडावर मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान, गडावरील कामकाजाच्या अनुषंगाने सप्तशृंगी देवीचे (Saptashrugi mandir) मंदिर दीड महिना बंद असणार आहे. २१ जुलै ते ०५ सप्टेंबरच्या काळात सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेता येणार नाही (Darshan closed). ऐन श्रावणाच्या काळात देवीचे दर्शन भाविकांसाठी बंद राहणार आहे. श्रावण महिना २९ जुलैपासून २८ ऑगस्टपर्यंत आहे. सरकारच्या पुरातत्व विभागाच्या निर्णयानुसार मंदिर बंद राहणार आहे.

हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज मंगळवारी सप्तशृंगी गडावर ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. यात गडावर मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. सप्तश्रृंगी गडाच्या मंदिराच्या खालच्या भागात असलेल्या दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्याचा जोर इतका जास्त होता की त्यामुळे गडावरील संरक्षक भिंतीवरील माती आणि दगड खाली आले आहेत. यात दोन मुलांसह सहा भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. आता पुढील काळात याची दुरुसीतीही करण्यात येणार आहे.

45 दिवस वणी गडावर दर्शन असणार बंद
साडे तीन शक्तिपीठांपैकी महत्त्वाचे स्थान असलेली सप्तशृंगी देवी ही अनेकांचे कुलदैवत आहे. तयामुळे गडावर उत्तर महाराष्ट्र आणि राज्याच्या इतर भागातूनही भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. श्रावणात नाशिक जवळील त्रंबकेश्वरच्या दर्शनाला येणारे भाविकही देवीच्या दर्शनाला येत असतात. यावेळी मात्र या भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार नाही. ४५ दिवस मंदिर दुरुस्ती आणि इतर कामकाजासाठी बंद राहणार आहे.