दापोऱ्याच्या तरुणावर नाशकात हल्ला, उपचार सुरू असताना मृत्यू

ऑगस्ट 28, 2021 11:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । दापोरा येथील रहिवासी तरुणाचा नाशिक येथे प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी घडली आहे. तुषार रघुनाथ काळे असे या मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे.

crime

तुषार काळे हा तरुण आपल्या कुटुंबासह नाशिक येथे गेल्या सहा वर्षांपासून वास्तव्यास होता. तो चहा टपरी चालविण्याचा व्यवसाय करीत होता. २६ रोजी सायंकाळी नाशिकच्या म्हसरूड भागातील रासबिहारी लिंक रोड लगतच्या चहाच्या टपरीवर संशयित आकाश काळेने तुषारच्या डाव्या मांडीत चाकू मारला. टपरी लावण्याच्या कारणावरून हा हल्ला झाल्याचे समजते. दरम्यान, हल्ल्यानंतर तुषारला खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, तुषारवर दापोरा येथे २७ रोजी संध्याकाळी ४ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आई, वडील असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now