जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । जामनेर पुऱ्यावरील चिंतामणी हनुमान व्यायाम शाळेसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य देण्यात आले आहे. सहा महिन्यातच या साहित्याची दुरवस्था झाली असून त्यामुळे जीविताला धोका असल्याबाबतचे निवेदन येथील यारी-दोस्ती ग्रुपच्या तरुणांनी मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना दिले.
जामनेर पुऱ्यावरील चिंतामणी हनुमान व्यायाम शाळेसाठी वर्षभरापूर्वी तब्बल पाच लाख रूपयांचे साहित्य देण्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या नियमांमुळे बंद असलेली व्यायामशाळा गेल्या सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाली. अवघ्या सहा महिन्यातच या व्यायामाच्या साहित्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे व्यायामासाठी जाणाऱ्या तरुणांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिकेने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे निवेदन जामनेर पुऱ्यावरील यारी-दोस्ती ग्रुपच्या तरुणांनी मुख्याधिकारी भोसले यांना दिले. या वेळी सचिन बोरसे, दीपक राजपूत, दीपक खाटीक, प्रदीप कल्याणकर, अश्विन जाधव, केतन सोनवणे, भूषण बुंदेले, राहूल भोलाणे, विकास सोनवणे, रोषण मराठे, विनय पाटील, नीलेश वाघ, अजय खुरपडे, भय्या पाटील यांच्यासह इतर तरूण उपस्थित होते.