जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२३ । यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आतापासून भेडसावत असल्याचे दिसून येत आहे. अद्यापही उन्हाळा सुरु झालेला नसून त्याआधीच पाणी टंचाईची भीती जाणत असल्याने उन्हाळ्यात काय स्थिती राहणार असा प्रश्न अनेकांना पडत आहे. दरम्यान, यंदा पिण्यासाठी गिरणा धरणाचे चार आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला आहे.
त्यानुसार पहिले आवर्तन सोडण्यात आले असून गिरणेचे पहिले आवर्तन आज मंगळवारी कानळद्यापर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे. दरम्यान, पहिले आवर्तन जामदा, म्हसावद बंधाऱ्यात आवर्तनाच्या पाणी अनुक्रमे रविवारी सायंकाळी व सोमवारी सकाळी पोहोचले.
या आवर्तनाचे पाणी आज कानळद्यापर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे. पहिल्या आवर्तनात १५०० क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहेत. गुरुवारी आवर्तन सोडल्यानंतर जामदा कालव्यात पाणी पोहोचले. हा कालवा भरुन झाल्यावर पाण्याचा प्रवाह एरंडोल तालुक्यात रविवारी पोहोचले.
त्यानंतर रात्री साडेदहा वाजता दहिगाव बंधारा पूर्णत: भरला. त्यामुळे ओव्हरफ्लो झालेल्या पाण्याचा प्रवाह सोमवारी सकाळी म्हसावद बंधाऱ्यात पोहोचले. सकाळी साडेदहा वाजता हा बंधारादेखील तुडुंब भरला. त्यानंतर बांभोरीच्या दिशेने पाण्याचा प्रवाह यायला सुरुवात झाली आहे. कांताई बंधारा भरल्यानंतर पाण्याचा प्रवाह कानळद्याच्यादिशेने आगेकूच करणार आहे.