जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२४ । भुसावळ, जळगावातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दादर – नंदुरबार ही गाडी नंदुरबार येथून भुसावळपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने गुजरात आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ रोखण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेसेवेमध्ये बोरिवली, विरार, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, भेस्तान, चलठाण, बारडोली, व्यारा आणि नवापूर या प्रमुख स्थानकांवर दोन्ही दिशेला थांबे असल्याने अनेकांची सोय होत आहे.
ही गाडी भुसावळपर्यंत केल्यास अमळनेर, धरणगाव, जळगाव व भुसावळच्या प्रवाशांची सोय होईल, असा मतप्रवाह खासदार वाघ यांच्याकडे व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार वाघ यांनी डीआरएमसह रेल्वे सल्लागार समिती, झेडआरयूसीसीचे सदस्य प्रतीक जैन यांच्याकडे ही गाडी भुसावळपर्यंत करण्याची मागणी केली होती. याला प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे