⁠ 
रविवार, मे 19, 2024

चाळीसगाव पूरग्रस्त भागाची कृषीमंत्री दादा भुसेंनी केली पाहणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यामध्ये आठ-दहा दिवसापूर्वी अतिवृष्टीमुळे महापूर आला आणि हजारोंचे संसार उघड्यावर पडले. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे हे शनिवार रोजी चाळीसगाव दौऱ्यावर होते. त्यांनी तालुक्यातील वाघडू, रोकडे, वाकडी, खेर्डे.तसेच इतर ठिकाणी पाहणी करून पंचनामा करण्याचे निर्देश दिले.

चाळीसगाव तालुक्यात 30 ऑगस्ट रोजी अचानक ढगफुटी झाली या ढगफुटीमुळे अनेक जनावरे वाहून गेली त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या चाळीसगाव तालुक्यातील वाघडू, वाकडी ,खेर्डे आदी गावांना मंत्री दादा भुसे यांनी भेट दिली.

या पाहणी दौऱ्यात मंत्री दादा भुसे यांच्या सोबत चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण व पाचोरा चे आमदार किशोर पाटील हे देखील उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी पूरपरिस्थिती ची व्यथा मंत्रिमहोदयांसमोर मांडली आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी तातडीने नुकसानग्रस्तांना मदत करण्यात येईल असे सांगितले.