मोठी बातमी ! जामनेरमध्ये गाडीत गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट, ओमनी जळून खाक

सप्टेंबर 29, 2025 3:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२५ । चारचाकी गाडीमध्ये अवैध पणे गॅस भरताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना जामनेर शहरातून समोर आलीय. गॅसचा भडका उडाला; यावेळी आजूबाजूला कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. परंतु संबंधित चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

jmr sphot

जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधून रिक्षा व चारचाकी गाड्यांमध्ये गॅस भरण्याचे अवैध प्रकार सुरु आहेत. मागच्या काही महिन्यापूर्वी जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुलीनजीक वाहनात गॅस भरताना झालेल्या स्फोटात अनेकांना जीव गमवावा लागला होता. तरी देखील जिल्ह्यात छुप्प्या पद्धतीने हा गोरधंदा सुरूच आहे. अशातच जामनेर शहरात आज चारचाकी गाडीमध्ये गॅस भरत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला.

सिलेंडरचा मोठा आवाज झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

प्राथमिक तपासामध्ये हे गॅस भरण्याचे काम बेकायदेशीररीत्या सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यांनतर पोलिसांनी संबंधित दुकानदार आणि गॅस भरणाऱ्या वाहनधारकावर तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानदार आणि वाहनधारक दोघेही अनेक दिवसांपासून हा अवैध व्यवसाय करत होते.

ही घटना उघडकीस आल्यानंतर जामनेर शहरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरण्याच्या व्यवसायावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now