⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

Cyber Crime : लकी ड्रॉच्या मेसेजवर भुलला, हजारो गमावून बसला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । लकी ड्रॉच्या मेसेजवर ३४ वर्षीय तरूणाला ४३ हजार ४५० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत तरुणाच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत गुलाब चौधरी (वय ३४) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण शहरातील एसएमआयटी महाविद्यालयाजवळ खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतो. दि. २८ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्याच्या मोबाईलवर ९ लाख ५० हजार रूपये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फेल झाल्याचा मॅसेज आला. त्यावरून हेमंत चौधरी याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता समोरील अनोळखी व्यक्तीने तुम्हाला लकी ड्रॉ म्हणून ९ लाख ५० हजार रूपये जिंकले आहे असे सांगून जीएसटी म्हणून ९ हजार ५०० रूपये खात्यात जमा करावे लागेल असे सांगितले.

दरम्यान, त्यानुसार, हेमंतने गुगल पे वरून राहूल कुमार सॉ नामक व्यक्तीच्या खात्यान ९ हजार ५०० रूपये भले. त्यानंतर पुन्हा इनकम ट्रॅक्स म्हणून ३३ हजार ९५० रूपये सेंट करण्याचे सांगितले. त्यानुसार हेमंत चौधरी याने पुन्हा पैसे पाठविले. परंतू लकी ड्रॉ चे पैसे आले नाही. यावरून आपली ४३ हजार ४५० रूपयांची फसवणूक झाल्याचे समजल्याने त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश भावसार करीत आहे.