⁠ 
बुधवार, जुलै 24, 2024

यावल तालुक्यातील ‘या’ गावात ४८ तासांसाठी संचारबंदी लागू ; नेमकं कारण काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२४ । यावल तालुक्यातील दहिगाव येथे बुधवारी रात्री मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर कुंभार वाड्यातील काही जणांनी मिरवणुकीत सहभागी तरुणांवर महापुरुषाच्या पोस्टरची विटंबना केल्याचा आरोप केला, यावरून दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला.

पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत वातावरण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काल दिवसभर गावात मोठ्या प्रमाणातमध्ये तणावाचे वातावरण दिसून आले. दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा फैजपुरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अर्पित चौहान यांनी दहिगावात गुरूवार ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेपासून ४८ तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे.

या संदर्भातील निर्देश जारी करण्यात आले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत कुणालाही घराबाहेर पडता येणार नसून अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने देखील बंद राहणार आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ (१) अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.