जळगाव जिल्हाबातम्या

ऋषी पंचमीला नदी काठी महिलांची गर्दी, जाणून घ्या संपूर्ण व्रत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२१ । भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी गणेश पूजन झाल्यानंतर दुसर्‍यादिवशी महाराष्ट्रासह देशभरात ऋषि पंचमी साजरी केली जाते. नकळत झालेल्या पापांमधून मुक्तता मिळावी आणि हिंदू पुराणानुसार, सातही ऋषींच्या स्मरणार्थ, त्यांच्याप्रती असणारा आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला ऋषी पंचमीचं व्रत करतात.

भारतात जुन्या विद्वान ऋषींबद्दल वाटणारी आपुलकी, निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणून ऋषीपंचमी हा सण साजराकेला जातो. सप्तर्षी, अरूंधती व गणपती यांची या दिवशी पूजा केली जाते. सप्तर्षींच्या सात, अरूंधतीची एक व गणपतीची एक अशा नऊ सुपा-या मांडून पूजा करतात व सोबतच बायका या दिवशी बैलाच्या मेहनतीचे काहीही खात नाहीत. तसेच गाईचे दूध पीत नाहीत. असे करणे जेव्हा शक्य नसेल तेव्हा फक्त उपवास करतात.

या व्रता दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात सात ऋषींची पूजा केली जाते व पाच प्रकारच्या किंवा एकवीस प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्या जेवणाच्या वेळी गणपतीला नैवेद्य दाखवून मग जेवण करण्याची पध्दत आहे.

महाराष्ट्रात गणेश चतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी ऋषी पंचमी साजरी करताना कश्यप, अत्रि,भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि, वशिष्ठ या सात ऋषींचे स्मरण केले जाते. महिला आणि तरूणी ऋषी पंचमीचा उपवास करताना दोन वेळेस केवळ ऋषी पंचमी विधेष बनवलेली भाजी आणि बैलांच्या मेहनतीशिवाय पिकवलेला जाडा तांदळापासून बनवलेला भात, काकडी, दही,चटणी असा हलका आहार करून दिवसभर व्रत करतात. या व्रतामध्ये जेवण वगळता केवळ दूध आणि फलाहार करण्याचा सल्ला दिला जातो.

ऋषी पंचमी दिवशी व्रताचा एक भाग म्हणून मोठ्याप्रमानात महिलावर्ग नदीवर जाऊन अंघोळ करतात, आघाड्याच्या सात पानांची जुडी केली जाते. ती डोक्यावर ठेवून सात वेळेस पाणी ओतले जाते. यानंतर कोरे कपडे घालून उपवासाचे जेवण घेतले जाते. ऋषी पंचमी हा गणेश चतुर्थीनंतर येणारा दुसरा दिवस असतो. या दिवशी अनेक घरांमध्ये दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. सार्वजनिक तलावं, पाणवठे, नदी किंवा आता कृत्रिम तलावांमध्ये गण्पतीचं विसर्जन केलं जातं.

Related Articles

Back to top button