---Advertisement---
बातम्या महाराष्ट्र

अबब..! वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर कोट्यवधींचं घबाड, सातबाराच आला समोर..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसापासून राज्यात एक मुद्दा चांगलाच गाजत आहे. तो म्हणजेच बीड मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराडच्याबाबत. वाल्मिक कराड (Valmik Karad) हा अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय असून कधीवेळी घरगडी कामगार असलेल्या वाल्मिक कराडच्या नावावर राज्यात विविध भागात कोट्यवधींची प्रॉपर्टी असल्याचे उघड होत आहे. याच वाल्मिकच्या नावावर पुण्यातही कोट्यवधींचे फ्लॅट आहेत. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या बायकोच्या नावावरही कोट्यवधींची प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर आली आहे.

valmik karad

वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे सोलापूर जिल्ह्यात देखील कोट्यावधी रुपयांची मासमत्ता असल्याचं समोर आलं आहे. बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधव हिच्या नावाने 4 जमिनीचे सातबारे असल्याचे ट्विट सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केले होते. या संदर्भात एबीपी माझाने अधिक माहिती घेतली असता ही तीच ज्योती मंगल जाधव आहे.

---Advertisement---

जिच्या नावावर पुण्यात देखील कोट्यावधी रुपयांची संपत्ती खरेदी करण्यात आली आहे. बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधवच्या नावे खरेदी करण्यात आले असून त्यांचे क्षेत्रफळ साधारण 35 एकर इतके आहे, तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती समोर आली आहे.

एप्रिल 2024 ते जुलै 2024 या चार महिन्याच्या कालावधीत ह्या चार ही जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आहे. या आधी ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यात दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलेलं होतं. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत देखील कोट्यावधी रुपयांची शेतजमीन खरेदी केल्याचे दिसते आहे, त्याचबरोबर पुण्यातील एफसी रोड याठिकाणी ज्योती जाधवच्या नावे दोन ऑफीस स्पेस घेतल्याची देखील माहिती समोर आली आहे.

कोणत्या ठिकाणी मालमत्ता?
1) पिंपरी चिंचवडमधील पार्क स्ट्रीट सोसायटीत जून 2021 मध्ये फोर बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला.
2) पिंक सिटी रोडवरील मि कासा बेला सोसायटीतील 403 नंबरचा हा फ्लॅट आहे. फ्लॅटवर वाल्मिक कराडचे नाव आहे.
3) पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराड आणि टोळीने 25 कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचा दावा आहे.
4) बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधवच्या नावे खरेदी करण्यात आले असून त्यांचे क्षेत्रफळ साधारण 35 एकर इतके आहे, तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती समोर आली आहे.
5) ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील हडपसर मधील अॅमेनोरा पार्क टाऊनशीप मधे Sector R 21, Tower 33, floor 17, फ्लॅट 07 हा फ्लॅट Sector R 21 , Tower 33 , फ्लॅट 08 हा आणखी एक फ्लॅट Gera Greensville, फ्लॅट नंबर A 3 , खराडी हा आणखी एक फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे. या फ्लॅटची किंमत दीड ते तीन कोटींच्या आसपास आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---