⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

प्रेयसीला भेटण्याची तळमळ, गुजरातचा कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२१ । प्रेयसीला भेटण्यासाठी अमळनेर येथे जाणार्‍या गुजरात राज्यातील सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. कैलास आधार पाटील (रा. महादेव नगर, डिंडोली, सुरत) असं संशयिताचं नाव असून मंगरुळ-पारोळा रोडवरुन त्याला अटक करण्यात आली आहे. कैलास हा गतवर्षीच्या‎ डिंडोली पोलिस ठाण्यात संशयित‎ होता. यासह त्याच्यावर एकुण १०‎ गुन्हे दाखल आहेत.

काय आहे प्रकरण?

कैलास आधार पाटील दहा गंभीर गुन्ह्यात सहभागी असून‎ सुरत पोलिसांचा ‘स्पेशल ऑपरेशन‎ गृप’ त्याच्या मागावर होता.‎ कैलास हा प्रेयसीला‎ भेटण्यासाठी अमळनेर येथे येणार‎ असल्याची माहिती पोलिस‎ निरीक्षक किरणकुमार बकाले यांना‎ मिळाली होती. तशी पोलिस‎ आपल्या मागवर असल्याचेही कैलासला समजले होते. त्यासाठी‎ सुरतचे पथक देखील जळगावात‎ दाखल झाले होते. पोलिसांना गुंगारा‎ देण्यासाठी तो प्रेयसीची भेट टाळून‎ पारोळा तालुक्यातील जंगलात लपून‎ बसला होता. त्यानुसार सुरत‎ पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे‎ निरीक्षक बकाले, अशोक महाजन,‎ संदीप पाटील यांनी सापळा रचून‎ संशयिताला ताब्यात घेतले.‎

अमळनेरकडे जाताना मुसक्या आवळल्या‎ सोमवारी पहाटे तो जंगलातून बाहेर पडून अमळनेरकडे जात असताना‎ पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. कैलास याच्या विरुद्ध खूनाचे दोन गुन्हे‎ दाखल आहेत. या शिवाय मुंबईच्या माहिम पाेलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा‎ दाखल आहे. सुरतच्या लिंबायक पोलिस ठाण्यात खुन, गुजरात पोलिस‎ कायदा कलम १३५, मारहाण, कोरोना निर्बंधाचे उल्लंघन, दंगल असे गंभीर‎ नऊ गुन्हे दाखल आहेत. पुढील चौकशीसाठी त्याला डिंडोली पोलिसांच्या‎ ताब्यात देण्यात आले आहे.‎

हे देखील वाचा :