क्राईम : मंदिरातील विविध वस्तू चोरणाऱ्या दोघांना अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । मंदिरातील तांब्या-पितळेच्या विविध वस्तू चोरणाऱ्या दोघांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले .पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरलेल्या विविध वस्तू पोलिसांसमोर सादर केल्या .
विनय सानप , ज्ञानेश्वर ठाकरे , हंसराज वाघ आणि रवींद्र मोरे हे पोलीस कर्मचारी नेहमीप्रमाणे रात्री गस्तीवर असताना त्यांना दोन जण मोटरसायकलवर संशयास्पद आढळून आले .विचारपूस केली असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला .सोनाळा फाट्यापर्यंत ते पळून जाण्यात यशस्वी झाले .मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला आणि अखेरीस अमजत शहा कादर शहा फकीर ( वय २० ) , अक्रम शहा मोहम्मद शहा ( वय – १८ ) रा .दोघे बिस्मिल्ला नगर जामनेर यांना रात्रीच्या अंधारात ताब्यात घेतले .
पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरलेल्या तांब्या-पितळेच्या घंटा , घागर , समया , दिवे असा सुमारे साडेबारा हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला .सदर वस्तू त्यांनी अजिंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले असून अजिंठा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे .दरम्यान पहूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांमध्ये वीज पंप चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे .श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरातील पितळी घंटा चोरीस गेली असून याबाबतही चोरी उघड होण्याची शक्यता आहे .पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे .