जळगाव लाईव्ह न्यूज । फेब्रुवारी २०२२ । रावेर तालुक्यातील पातोंडी गावाजवळील नदी पात्रातून रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. या प्रकरणी दोन जणांविरोधात येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
बुधवारी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास डीवायएसपी विवेक लवांड हे गस्तीवर असताना इरफान तडवी हा त्याच्या ताब्यातील स्वराज कंपनीचे लाल रंगाच्या ट्रॅक्टरद्वारे विना परवानगी वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याचे आढळून आले. ही कारवाई बंडू चौकाकडे जाणाऱ्या संभाजी नगर जवळील पुलावर करण्यात आली आहे. यावेळी शेख सौद शेख शाकीर याला पोलिसांची चाहूल लागताच ताे पळून गेला.
या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर व बजाज प्लॅटिना मोटारसायकल असा एकूण दोन लाख ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. हवालदार रशीद रफिक तडवी यांनी फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल झाला.
- हेडफोन लावून रेल्वेरूळ ओलांडणे जीवावर बेतले ; तरुणीचा जागीच मृत्यू
- उटखेड्यात चोरट्यांचा डल्ला, लाखांचा ऐवज लंपास
- पशुधनांवर डल्ला मारणाऱ्या संशयितांना मालेगावातुन अटक
- किरकोळवादातून दोन गट भिडले, परस्परविरोधी तक्रार; धरणगावमधील घटना
- चांदीचे कडे हिसकावण्यासाठी वृध्देवर हल्ला; शेजारी महिलेची चाहूल लागताच भामट्याने साहित्य सोडून ठोकली धूम
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज