Wednesday, July 6, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

तरुणीशी गैरवर्तन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

crime 2022 06 03T115923.372
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
June 3, 2022 | 12:00 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । महावितरण कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या तरूणीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोन जणांनविरोधात गुन्हा दाखल झाला.

महावितरण कार्यालयातील व्यवस्थापक उद्धव कडवे व लिपीक राजेंद्र आमोदकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरूणीच्या फिर्यादीत म्हटले आहे की, ती महावितरणच्या कार्यालयात कंत्राटी पध्दतीवर कार्यरत असतांना सन २०१७ ते २०२१ या काळात कडवे हे नेहमीच त्रास देत होते. सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतरही उशिरापर्यंत कार्यालयात थांबवून ठेवत होते. ते व्हॉट्सऍपवर चॅटिंग करण्याची मागणी करत होते. तसेच घरी सोडून देतो, घेण्यासाठी येतो असे सांगून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे म्हणने ऐकून न घेतल्याने तीन वेळा कामावरून कमी केले. नंतर पुन्हा कामावर घेऊन त्रास देणे सुरूच ठेवले. २०२१मध्ये पीडित तरुणीने काम सोडले.

यानंतर ११ मे रोजी आमोदकर याने तरुणीला फोन करून जावक रजिस्टरमध्ये नोंदी घ्यायचे काम शिल्लक असल्याने तुला कडवे साहेबांनी बोलावल्याचा निरोप दिला. त्यानुसार तरुणी १२ मे रोजी कार्यालयात गेली. या वेळी कडवे यांनी मागे झालेल्या प्रकाराची माफी मागितली, टेक्निकल साइटचे लोक माझ्या विरुद्ध कट रचत आहेत, तू त्यांना सपोर्ट करते आहेस असे मला कळले आहे अशी विचारणा केली. तरुणीने त्यावर नकारात्मक उत्तर दिले. तुला पुन्हा कामावर घेण्यासाठी प्रयत्न करतो असे कडवेंनी सांगितले. काम संपल्यानंतर आमोदकर दुचाकीने घरी सोडून देईल, असे सांगितले; परंतु तरुणीने नकार दिला. या घडलेल्या प्रकाराची तक्रार तरुणीने महावितरणच्या विशाखा समितीकडे केली आहे. परंतु, समितीने त्यावर काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

यानंतर लिपीक आमोदकर याने कार्यालयाच्या परिसरात तरुणीला भेटून कडवे साहेब चांगले आहेत, तुझे काम करून देतील असे सांगतांनाच तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी तपास करीत आहेत. महावितरणमधील या प्रकरणी अनेक संघटना आक्रमक झाल्यानंतर अखेर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात पुढे काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in गुन्हे, जळगाव शहर
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
gas subsidy

गॅस सिलेंडरवरील सबसिडीबाबत सरकारचा मोठा खुलासा

crime 2022 06 03T122759.248

चहाच्या टपरीतून पावणे दोन लाखांची रोकड लांबविली

AC Shoes

उन्हाळ्यात शूज घालताना घाम येतो? मग खरेदी करा हे एसी शूज, जाणून घ्या किंमत?

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group