मुलीसह आईला दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा

मार्च 19, 2022 2:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२२ । मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्यावर मुलीसह तिच्या आईला दगडाने बेदम मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 1 jpg webp

काय आहे घटना?
जळगाव शहरातील भारतनगर येथे आशाबाई बडगे या मुलीसह वास्तव्यास असून त्यांच्या मुलीची भारत नगरातच राहणार्‍या काही तरुणांनी छेड काढली होती. १६ मार्च रोजी आशाबाई त्याचा जाब विचारला असता तरूणांनी घरात घुसून आशाबाई व त्यांच्या मुलीला दगडाने मारहाण करून दुखापत केली तर इतरही दोन ते तीन जणांनी मारहाण केली.

अशा आशयाच्या आशाबाई बडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी मोहन भालेराव, राजू भालेराव यशवंत भालेराव, बळवंत भालेराव, समाधान भालेराव (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. भारतनगर या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now