जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२५ । जळगाव शहरात पुन्हा एकदा देहविक्रीच्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. शहरातील एमआयडीसीतील एच सेक्टरमधील हॉटेल तारा येथे सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका केली. या कारवाईत हॉटेल मालकासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान यातील तिन्ही हॉटेल तारा येथे कारवाई महिला बांगलादेशी असल्याची माहिती समोर येत आहे.

एमआयडीसी परिसरात एच सेक्टरमध्ये हॉटेल तारा येथे काही महिलांकडून देहविक्रयचा व्यवसाय केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार एएचटीयू पथकाने बुधवारी सायंकाळी सापळा रचला. हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून त्याने खोलीत गेल्यावर लाइट दोन वेळा बंद सुरू करण्याचा सिग्नल देण्याचे ठरले. त्यानुसार सिग्नल मिळताच पथकाने छापा टाकला. हॉटेलमधून तीन महिलांची सुटका केली. पथकाने हॉटेल मालक योगेश देवरे याच्यासह दोन कर्मचारी व दोन ग्राहक अशा पाच जणांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.

तिन्ही महिला बांगलादेशी
सुटका केलेल्या तिन्ही महिलांकडे कोल्हापूरचा पत्ता असलेले आधार कार्ड पोलिसांना सापडले. मात्र त्यांना भारताचे राष्ट्रगीत माहीत नाही. ते म्हणता येत नाही. मराठी व हिंदी बोलता येत नाही. यावरून त्या बांगलादेशी असण्याची शक्यता आहे.










