बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखांचे वेतन उचलले; माजी मुख्याध्यापकासह ५ जणांवर गुन्हा

जानेवारी 24, 2026 10:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणूक करत लाखो रुपयांचे वेतन उचलल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी इकरा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम अब्दुल मजीद सालार यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिस ठाण्यात माजी मुख्याध्यापक, वरिष्ठ सहाय्यक तसेच उपशिक्षकांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेतील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

crime 2 jpg webp

आरोपींमध्ये उपशिक्षक सैय्यद अमरुल्लाह सैय्यद चाँद कासार, त्यांचे वडील व संस्थेचे उपाध्यक्ष सैय्यद चाँद सैय्यद अमीर (दोन्ही रा. जळगाव), सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख नईमुद्दीन शेख अफजलुद्दीन (रा. नशिराबाद), जि.प.चे वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र रघुनाथ चौधरी तसेच भडगाव उर्दू शाळेतील उपशिक्षक शेख जहीर शेख सलाउद्दीन यांचा समावेश आहे.

Advertisements

तक्रारीनुसार, संस्थेच्या नियमांनुसार पदाधिकारी व त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना त्याच संस्थेत नोकरी देणे निषिद्ध असताना, उपाध्यक्ष सैय्यद चाँद कासार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मुलगा सैय्यद अमरुल्लाह याची २०१८ मध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती केली. सदर नियुक्तीचा मूळ प्रस्ताव प्रलंबित असतानाही बनावट सही व आदेश तयार करून अनुदानित तत्त्वावर मान्यता मिळवली.

Advertisements

या बनावट आदेशांच्या आधारे शालेय वेतन प्रणालीत नाव समाविष्ट करून न्यायालयाची दिशाभूल करत लाखो रुपयांचे वेतन उचलण्यात आले. औरंगाबाद खंडपीठात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकारामुळे शासनाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
पोलिस पुढील तपास करत असून, या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now