जळगाव जिल्हायावल

डोंगर कठोरा येथे १७ पासून रंगणार क्रिकेटचे सामने

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लबतर्फे, खुल्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. १७ फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होत आहे.

स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ११ हजार रुपये व चषक सलीम तडवी यांच्याकडून, तर द्वितीय बक्षीस ५ हजार रुपये व चषक डॉ. कुंदन फेगडे यांच्याकडून दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी जि.प.चे माजी शिक्षण सभापती हर्षल पाटील, सदस्या सविता भालेराव, पंचायत समितीचे उपसभापती योगेश भंगाळे, उदय बाऊस्कर आदींचे सहकार्य लाभत आहे. या स्पर्धेचे आयोजक बुद्धभूषण आढाळे, संजय आढाळे, नयन ढोके, अरविंद पांडवसह न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लब डोंगर कठोरा हे आहेत.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button