⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी डॉ. सी.पी. लभाणे

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी डॉ. सी.पी. लभाणे यांची एकमताने निवड करण्यात आली. नाशिक येथे झालेल्या जिल्हा मेळाव्यात राज्याच्या अध्यक्षा रेखा ठाकूर आणि राज्य सरचिटणीस दळवी उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा मेळावा राज्याच्या अध्यक्षा रेखा ठाकूर आणि राज्य सरचिटणीस दळवी यांच्या उपस्थितीत नाशिक येथे पार पडला. या मेळाव्यात उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यात जळगाव येथील डॉ. सी.पी. लभाणे यांची वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. या विभागात नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

उत्तर महाराष्ट्र विभागात वंचित बहुजन आघाडीचे रचनात्मक आणि संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे यासाठी डॉ. सी.पी. लभाणे यांच्यासह नवीन कार्यकारिणी काम करणार आहे. त्यांची निवड झाल्याबद्दल डॉ. योगेश महाले, डॉ. के.के. वळवी, प्रा. सतीश पडलवार, नाना अहिरे, प्रा. संजय हिंगोणेकर, डॉ. सत्यजित साळवे, डॉ. विजय कांबळे, डॉ. जयेश पाडवी यांसोबतच सर्व स्तरातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.