जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते अश्या शब्दात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. यावेळी ते म्हणाले कि, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुंबईतील सभा ही ऐतिहासीक झाली असून याला कसा प्रतिसाद मिळाला हे सर्वांनी पाहिले आहे. आणि यामुळे गिरीश महाजन यांनी काय वक्तव्य केले याला महत्व नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत नुकतीच सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपवर व मोदींवर टीका केली होती. यावर बोलताना माजी जलसंपदा मंत्री आ गिरीश महाजन यांनी रविवारी धुळे येथे शिवसेना गटारीतले बेडूक आहे. अश्या शब्दात शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेनेची अवस्था ही गटारीतल्या बेडकासारखी असून भाजपच्या जीवावर मोठा झालेला हा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत या पक्षाचे चार खासदार आणि पंचवीस आमदार निवडून येतील की नाही याची खात्री नाही असे महाजन म्हणाले होते.
या पार्श्वभूमिवर जळगावात पत्रकारांशी बोलतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी संबंधीत विषयावर भाष्य केले. याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते