खांबात विद्युत प्रवाह उतरला, महिलेसह गाय ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । वीजपुरवठा करणाऱ्या खांबात वीज प्रवाह उतरल्याने एक गाय आणि एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी भुसावळ तालुक्यातील वराडसीम जोगलखोरी शिवारात घडली. कमलबाई सुरेश पाटील असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत असे की, वराडसीम जोगलखोरी शिवारातील नरेंद्र विठ्ठलदास लढ्ढा यांच्या मालकीच्या शेतात लोखंडी वीज खांबात वीजप्रवाह उतरला. त्यात गाय आणि कमलबाई सुरेश पाटील नामक महिलेचा मृत्यू झाला.

ग्रामस्थ तसेच पदाधिकारी यांनी या घटनेबाबत वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यास माहिती कळविण्यासाठी फोन केला, पण त्यांनी फोन न घेतल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. ही माहिती पोलीस पाटील सचिन वायकोळे यांनी दिली.