दुर्दैवी! आयशरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ठार, तीन वर्षाचा चिमुकला थोडक्यात वाचला..

जून 24, 2023 3:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२३ । महामार्गावर होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच आहे. अशातच आयशरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी नशिराबादजवळ असलेल्या महाजन हॉटेलच्या जवळ घडली. शेनफडू बाबूराव कोळी (रा. सामरोद, ता. जामनेर) आणि भारती शेनफडू कोळी (रा. सामरोद, ता. जामनेर) या दाम्पत्याचे नाव आहे.

ns 1 jpg webp

जामनेर तालुक्यातील सामरोद येथील शेनफडू बाबूराव कोळी हे त्यांच्या पत्नी भारती आणि तीन वर्षाचा त्यांच्या मुलासह दुचाकीवरून नशिराबादमार्गे जामनेर आणि सामरोद येथे जात होते. याच दरम्यान, आज सकाळी साडेदहाच्या सुमारास एमएच १९ एए २०९५ क्रमांकाच्या त्यांच्या दुचाकीला भरधाव आयशरने उडविले. या भीषण अपघातात कोळी दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर सुदैवाने त्यांचा रूद्र हा तीन वर्षाचा मुलगा बचावला आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now