Big Breaking : कुसुंबा येथे दाम्पत्याचा खून?

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । जळगाव येथून जवळच असलेल्या कुसुंबा येथे स्वामी समर्थ शाळेच्या मागे एका दाम्पत्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. दरम्यान, दोघांचा खून झाला आहे हे अद्याप निश्चित नसून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहे.

कुसुंबा येथील स्वामी समर्थ शाळेच्या मागे राहणाऱ्या मुरलीधर राजाराम पाटील (वय-५०) आणि आशाबाई मुरलीधर पाटील (वय-४२) यांचा राहत्या घरात खून करण्यात आला असल्याचा प्रकार दुपारी ४ वाजता उघड झाला आहे. 

मयताच्या गळ्यावर खून असल्याने त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे. दरम्यान, खून कशामुळे झाला आणि कुणी केला हे अद्याप कळू शकले नसले तरी पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.