धक्कादायक : वड्री-परसाडे नजीक प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

एप्रिल 13, 2021 8:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२१ । यावल तालुक्यातील वड्री परसाडे जवळ प्रेमीयुगुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. मिना शावखा तडवी (22) रा. परसाडे व शाहरुख बाबु तडवी (19) रा. हरीपुरा असे मयत झालेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

crime (1)

आज दुपारी वड्री परसाडे गावाजवळील शेतात प्रेमीयुगुलाने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. एका शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळून आले.  वड्री येथील पोलिस पाटील इब्राहिम तडवी यांनी दिलेल्या खबरीनुसार यावल पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now