⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

वाकोद येथे चक्क उपसरपंंचांच्या शेतातून कापसाची चाेरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । वाकोद येथील उपसरपंच रवींद्र भगत तसेच नीलेश भगत यांच्या शेतातील दहा क्विंटल कापूस चोरीला गेल्याची घटना ११ रोजी सकाळी उघड झाली. अज्ञात चोरट्यांनी शेतातील गोदामातून कापूस लंपास केला. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

अधिक माहिती अशी की, वाकोद-तोंडापूर रस्त्यावर गावापासून साधारण अर्धा किमी अंतरावर असलेल्या शेतातील गोदामात ९० क्विंटल कापूस ठेवला होता. त्यापैकी २० क्विंटल कापूस बाजूच्या पत्री शेडमध्ये ठेवलेला होता. शेडचा पत्रा काढून चोरांनी कापूस लांबवला. घटनास्थळी चारचाकी वाहनाच्या टायरच्या खुणा उमटल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांनी वाहनातून कापूस नेला असावा, असा अंदाज आहे. दरम्यान, पहूर पाेलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप चेडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.