जागतिक महिला दिनानिमित्त मु.जे. महाविद्यालयातर्फे एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । जागतिक महिला दिनानिमित्त तत्वज्ञान विभाग मु.जे.(स्वायत्त) महाविद्यालयातर्फे एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.स.ना.भारंबे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रा.डॉ.शुक्ला महंती, कुलगुरू कोल्हन विद्यापीठ, चैबासा,झारखंड यांनी महिला दिनाचे महत्व स्पष्ट केले. याप्रसंगी दोन प्रमुख वक्ता काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या प्रा.डॉ.ज्योत्स्ना श्रीवास्तव तसेच शासकीय नर्मदा कॉलेज, होशंगाबाद येथील प्रा.डॉ.विनिता अवस्थी यांनी स्त्री शक्तीचे रूप, महिलांचे अधिकार आणि सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी तत्वज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.रजनी सिन्हा यांनी विषय प्रवर्तन केले. मंगलाचरण प्रस्तुती प्रा.राजश्री पाटील तसेच आभार प्रा.अमोल पाटील यांनी केले. गूगल मिट आणि युट्यूबवर ऑनलाईन प्रसारण करण्यासाठी संगणक विभागाचे प्राध्यापक प्रा.भूषण पाटील आणि प्रा. सचिन कोल्हे यांचे सहकार्य मिळाले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.