⁠ 
बुधवार, मे 22, 2024

बेकायदेशीर पीक कर्जाची वसुली‎ करणाऱ्या संस्थेला ग्राहक न्यायालयाचा दणका‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी‎ सन्मान योजनेत कर्जमाफीत‎ लाभार्थी असून देखील विविध‎ कार्यकारी सोसायटीने‎ बेकायदेशीपणे वसुली काढली होती.‎ संबधित शेतकाऱ्याने ग्राहक‎ न्यायालयात धाव घेतल्यानंतर‎ न्यायालयाने सोसायटीला दणका देत‎ शेतकऱ्याच्या बाजुने निकाल दिला‎ आहे.‎ ‎

संतोष देवराम पाटील (रा.‎धानोरा, ता.चोपडा) यांची‎ वडिलोपार्जित शेती आहे. अल्प‎ पावसामुळे पुरेसे उत्पन्न न झाल्याने‎ ते ३१ मार्च २०१६ रोजी दीड लाख‎ रुपयांच्या पीक कर्जाची मुद्दल व‎ व्याजाची रक्कम फेडू शकले‎ नव्हते. त्यामुळे ते थकबाकीदार‎ झाले होते. नंतर शासनाच्या छत्रपती‎ शिवाजी महाराज शेतकरी सन्मान‎ योजनेत लाभार्थी होऊन त्यांनी‎ ओटीएसद्वारे (एक वेळ समझोता‎ ‎ योजना) १ लाख २२ हजार ५०६‎ रुपये भरले होते. त्यामुळे उर्वरीत २२‎ हजार १५० रुपये थकबाकी माफ देणे‎ क्रमप्राप्त होते. तरी देखील‎ सोसायटीने कर्ज माफी दिली नाही.‎ कोणतीही बाकी नसल्याबाबतचा‎ दाखला दिला नव्हता.‎ त्यामुळे पाटील यांनी ग्राहक‎ न्यायालयात धाव घेतली.‎ न्यायाधीश सुरेश जाधव, पुनम‎ मलीक यांच्यासमोर सुनावणी‎ झाली. सुनावणीअंती न्यायालयाने‎ ‎ धानोरा विविध कार्यकारी‎ सोसायटीने पाटील यांना कोणतीही‎ बाकी नसल्याचा दाखला द्यावा,‎ उर्वरीत २२ हजार १५० रुपये माफ‎ करण्यात आले. तसेच पाटील यांना‎ शारिरीक व मानसिक त्रासापोटी‎ पाच हजार व तक्रार अर्जाच्या‎ खर्चापोटी तीन हजार रुपये अदा‎ करावेत असा निकाल दिला. पाटील‎ यांच्यातर्फे ऍड. प्रवीण झंवर,‎ अशोक महाजन व हेमंत भंगाळे‎ यांनी काम पाहले.‎

हे देखील वाचा :