⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | बोदवड | Corruption : ग्रामरोजगार सेवकास पदावरून कमी‎ करण्याचे आदेश

Corruption : ग्रामरोजगार सेवकास पदावरून कमी‎ करण्याचे आदेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । बोदवड‎ तालुक्यातील नांदगाव येथील‎ ग्रामरोजगार सेवक गौतम बाबुराव‎ निकम यांना पदावरून कमी‎ करण्याचे आदेश, २० रोजी प्रभारी‎ गटविकास अधिकारी शशिकांत‎ सोनवणे बोदवड यांनी नांदगाव‎ येथील ग्रामसेवक व सरपंच यांना‎ दिले आहेत.‎ 

निमखेड शिवारातील गट क्रमांक‎ १६३ मध्ये बाबुराव निकम व नांदगाव‎ येथील ग्राम रोजगार सेवक गौतम‎ निकम यांनी एकाच शेतात दोन‎ विहिरींचे महात्मा गांधी रोजगार हमी‎ योजनेअंतर्गत अनुदान घेतले होते.‎ परंतु एकाच विहिरीचे खोदकाम व‎ बांधकाम केले होते. दुसऱ्या विहिरीचे‎ अंदाजित अनुदान १ लाख ३४ लाटून‎ भ्रष्टाचार केला होता. माहिती‎ अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या‎ वतीने जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन‎ आसने यांनी याबाबत तक्रार दाखल‎ केली होती.‎

author avatar
टीम जळगाव लाईव्ह